साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित विविध क्षेत्रातील समाजसेवकांचा सन्मान.


पुणे : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निम्मित बोपोडीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव आणि अखिल बोपोडी मातंग युवक संघटनेच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे समाजसेवकांचा सन्मान सोहळा बोपोडी येथील महात्मा फुले हॉल मध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश पवार प्रमुख उपस्थिती बहुजन भीमसेना संस्थापक अध्यक्ष मोहन मस्के, स्वीकृत नगरसेवक करीमलाला शेख, अण्णाभाऊ साठे ट्रस्ट अध्यक्ष तुषार मोहिते, काँग्रेस नेते इंद्रजित भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस सर चिटणीस विजय जाधव, शशिकांत पांडुळे, पोपटराव खंडागळे, गवई गटाचे रवींद्र कांबळे, सत्यवान गायकवाड, कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक अध्यक्ष अंकुश साठे, सादिकभाई शेख, सचिन कदम, मिलिंद ढवळस्कर, कार्याध्यक्ष सूर्यकांत सकट, खजिनदार राजेश शेंडगे, चिटणीस शिवाजी कसबे, राहुल पुंडे, विशाल घाडगे, संगीताताई देवकुळे, दिलशाद अत्तार, बेबीताई काटकर, वैशाली गायकवाड, अख्तरी शेख, शोभाताई आरुडे, राजश्री कांबळे, रवी नायर, शामराव गायकवाड, भगवान कांबळे, विजय सरोदे, विनोद सोनवणे, अकबर शेख, करीम तुर्क उपस्थित होते.
या वर्षीचा अण्णाभाऊ साठे विशेष प्राविण्य पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लेखक मोहन मस्के, क्रीडा प्रशिक्षक पंच प्रा. राजेंद्र मागाडे, पत्रकार निवेदक दत्ता सूर्यवंशी, कराटे असोसिएशनचे नवोदित खेळाडू  घडविणारे सेन्सयू  राजू थापा, प्रसिद्ध चित्रकार मनोज निकाळजे, युवा क्रिकेटर राहुल शहा, फोटोग्राफर संदीप भिसे, सॉफ्टवेअर इंजिनिअर अंकित नाईक. इत्यादींचा स्मुर्तिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश साठे सूत्रसंचालन दत्ता सूर्यवंशी आणि आभार राजेश शेंडगे यांनी मानले.

See also  शेतकरी उत्पादक संस्था बळकट करण्याचे शासनाचे प्रयत्न-पणन मंत्री अब्दुल सत्तार