साईचौक ते मधुबन बालेवाडी या रस्त्यावरच मांस टाकले जात असल्याने नागरिक त्रस्त

बालेवाडी : साईचौक ते मधुबन बालेवाडी या रस्त्यावरील पदपथावर दररोज दिसणारे मटन चिकनशाॅपमधील निरुपयोगी झालेल्या जिवांचे अवशेष मांसाचे तुकडे टाकले जात असून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

चिकन व मटन चे तुकडे रस्त्यावर टाकले जात असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात कुत्री जमा होत असून पहाटे फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना भीती निर्माण होत असून कुत्र्यांच्या टोळ्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

रस्त्यावरती मांस टाकले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. बाणेर बालेवाडी परिसरातील चिकन मटन शॉप अनाधिकृत असून यांचा ओला कचरा हा योग्यरित्या जिरवला जात नाही. प्राण्यांचे कोंबड्यांचे अवशेष रात्री अपरात्री रस्त्याच्या कडेला अथवा मोकळ्या जागांमध्ये टाकले जात असल्याने दुर्गंधी निर्माण होते.

बाणेर बालेवाडी परिसरातील अनाधिकृत चिकन मटन शॉप चा सर्वे करून त्यावर कारवाई करण्यात यावी तसेच रस्त्यावर मांस टाकणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांना नेहमीच सहकार्य-पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन