पुणे – व्यापारी दिनानिमित्त कसबा विधानसभा मतदारसंघातील विविध व्यावसायिकांना भेटून काल (शनिवारी) स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी शुभेच्छा दिल्या आणि सन्मान पत्र देऊन सत्कारही केला.
मतदारसंघातील कापड विक्रेते, इलेक्ट्रीकल वस्तूंचे विक्रेते, लाकडी फर्निचर विक्रेते, फुलांचे विक्रेते, कागदाचे व्यापारी अशा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यापारी पेढ्यांना भेट देऊन रासने यांनी सन्मान पत्र देऊन त्यांचे सत्कार केले. याप्रसंगी भाजप कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, व्यापारी संघाचे अध्यक्ष नितीन पंडित, प्रदेश सचिव कल्पेश ओसवाल तसेच नयन ठाकूर, अमर शाह, मनिष जाधव, राकेश चाचर, जितेंद्र अंबासनेकर, पंकज सकारिया, अमित मुनोत, संजय मुनोत आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.