पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंती निमित्त आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत आज रक्तदान शिबिर भरवण्यात आले. यामध्ये 51 जणांनी रक्तदान केल्याची माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे सचिव मेघश्याम देशपांडे यांनी दिली.
यावेळी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर, भाजपचे शहराध्यक्ष धिरज घाटे भाजप व्यापारी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र व्यास, भाजप महिला शहराध्यक्ष हर्षदा फरांदे, महिला सरचिटणीस प्रियंका शेडगे – शिंदे, सरचिटणीस व्यापारी आघाडी नयन ठाकूर, भाजप कसबा विधानसभा ओबीसी अध्यक्ष देवेंद्र वडके, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, माजी नगरसेवक महेश वाबळे, अमित कंक सरचिटणीस कसबा मतदारसंघ, राजू दादा परदेशी सरचिटणीस कसबा मतदारसंघ आदी यावेळी उपस्थित होते.
उपक्रमांबद्दल बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रितम थोरवे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर फाऊंडेशनच्या वतीने यंदा प्रथमच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आम्ही तीन दिवस विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे, त्याचाच एक म्हणून आजचे रक्तदान शिबीर भरवण्यात आले होते, आमच्या सर्व उपक्रमांना आणि गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल येथे होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे थोरवे यांनी नमूद केले.