पुणे :- शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील मतमोजणी केंद्राची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला.
यावेळी उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, पोलिस उप अधीक्षक प्रशांत ढोले आदी उपस्थित होते.
मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करावयाचे विविध कक्ष, विविध सोयी-सुविधांची उभारणी, उमेदवार यांच्या प्रतिनिधींसाठी व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष, मतमोजणी पथके अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात येऊन आढावा घेण्यात आला.
मतमोजणीच्या अनुषंगाने करावयाच्या सुरक्षा उपाययोजनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. मतमोजणी शांततेत आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पडेल याची दक्षता घ्यावी, आवश्यक सुविधांची तातडीने व्यवस्था करावी अशा सूचना श्री.मोरे यांनी यावेळी दिल्या. बैठकीनंतर श्री.मोरे यांनी वाहनतळाची पाहणी केली.
तत्पूर्वी शिरूर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे भोसरी येथे श्री.मोरे यांच्या उपस्थितीत प्रथम प्रशिक्षण घेण्यात आले.