बाणेर येथील ज्ञानेश्वर बाळाजी मुरकुटे पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला

बाणेर : अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानेश्वर बाळाजी मुरकुटे पाटील विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षेचा सन 2022-23 चा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. यात प्रथम क्रमांक दुर्गाश्री संजय पवार (89.60℅), द्वितीय क्रमांक अर्पिता रामचंद्र बनकर (89.20℅) व प्रांजली प्रतापराव अंभुरे (89.20℅) तर तृतीय क्रमांक गायत्री सुरेश शिंदे (88.60℅)
या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे. यांच्या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री.अशोक मुरकुटे सर यांचा मार्गदर्शनपर मोलाचा वाटा आहे. सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेच्या या घसघशीत यशाबद्दल शाळेच्या कार्यकारी मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. महाजन दिपाली तसेच त्यांचे सर्व मार्गदर्शक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अभिनंदन केले.

See also  हरिलीला सोसायटी येथील ड्रेनेज लाईनची सहाय्यक आयुक्तांनी केली पाहणी मंगळवार पासून काम सुरू करणार