पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी

पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी कोरेगाव पार्क येथील पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्राची संयुक्त पाहणी करुन व्यवस्थेचा आढावा घेतला.

यावेळी पुणे विभागीय अपर आयुक्त तथा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, हिम्मत जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करावयाचे विविध कक्ष, विविध सोयी- सुविधांची उभारणी, उमेदवार, उमेदवार यांचे प्रतिनिधींसाठी व्यवस्था, मतमोजणी पथके, पोलीस आदींना पुरवावयाच्या सुविधा, पोलीस सुरक्षा, वाहनतळांची जागा निश्चिती, वाहतूक वळविणे आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली. मतमोजणीच्या अनुषंगाने विविध घटकांना कोणताही त्रास होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टीने सर्व ती खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

See also  कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला मदतीसाठी सहकार्य करु – राज्यपाल रमेश बैस