भ्रष्टाचाराने वाकलेल्या स्मार्ट सिटी चे चित्र सध्या वाकलेल्या खांबान मधून बालेवाडी परिसरात पहायला मिळत आहे

पुणे : भ्रष्टाचाराने वाकलेल्या स्मार्ट सिटी चे चित्र सध्या बाणेर बालेवाडी औंध परिसरात जागोजागी अशा विद्युत खांबांच्या माध्यमातून पाहिला मिळत आहे.

औंध बाणेर बालेवाडी स्मार्ट सिटी एरिया मधील स्मार्ट सिटी च्या वतीने पुणे महानगरपालिकेतील अनेक रस्त्यावरील खांब बदलण्यात आले आहे. या खांबांची गुणवत्ता फारशी चांगली नसल्याने अनेक ठिकाणी हे काम मधूनच तुटल्याचे पाहायला मिळत आहे.

रस्त्यांच्या मध्य भागामध्ये हे काम वाकलेले अथवा तुटलेले दिसत असून याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या खांबांवर अनधिकृत केबल टाकण्यात आल्या असून पुणे महानगरपालिकेच्या वतीने कारवाई वेळोवेळी होत नसल्याने विद्युत खांब तुटत असल्याचे देखील प्रकार औंध बाणेर परिसरात घडले आहेत.

बाणेर बालेवाडी औंध परिसरामध्ये स्मार्ट सिटी ने उभारलेले प्रकल्प हे नागरिकांच्या फारसे उपयोगी ठरताना दिसत नसून स्मार्ट सिटी उभारत असलेल्या कामांमध्ये फारशी गुणवत्ता देखील दिसून येत नाही. स्मार्ट सिटीच्या कामांचे पुन्हा गुणवत्ता परीक्षण करण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच रस्त्यांच्या मध्ये तुटलेले खांब बदलण्यात यावे व खंबांवरील अनधिकृत केबल टाकणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे.

See also  एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे आयोजित सामाजिक नेतृत्व विकास कार्यशाळेचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत समारोप