मॉर्निंग ग्रुप व विघ्नहर्ता नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान

पुणे :  मॉर्निंग ग्रुप पाषाण आणि विघ्नहर्ता नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी विनामूल्य करिअर संबंधी मार्गदर्शन आणि शिक्षण क्षेत्रामध्ये असणाऱ्या संधी याविषयी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.पाषाण सुसरोड विघ्नहर्ता चौक येथील लोकसेवा ई स्कूल मध्ये उद्या रविवार दि. २ जून रोजी दुपारी ३.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दहावी-बारावी परीक्षेचा निकाल लागला असुन विद्यार्थी आणि पालक यांच्यामधे पुढे काय करायला हवे याबद्दल संभ्रम निर्माण झालेला असतो. तो दूर व्हावा या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. म्हणुनच माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा फायदा घ्यावा व व्याख्यानास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  सुसगांवचे पोलीस पाटील मुरलीधर चांदेरे पाटील यांचे हृद्यविकाराने निधन