धायरी : खडकवासला धायरी, सिंहगड रोड परिसरात शालीवहन शक कालगणनेनुसार गुढीपाडवा सणाने हिंदू नविन वर्षाला सुरुवात झाली.ग्रामदैवत, शिवकालीन मंदिर तसेच, दुकाने, उद्योग,घरांवर गुढी उभारून नव वर्षाचे पारंपरिक रिवाजात स्वागत करण्यात आले.
धायरी येथील शिवकालीन ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरावर काळभैरवनाथ देवस्थानचे ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक रिवाजात गुढी उभारण्यात आली.देवस्थानचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील , उपाध्यक्ष सुनील पोकळे, सचिव पंढरीनाथ पोकळे, खजिनदार गुलाबराव पोकळे, महेंद्र भोसले ,विष्णू कामठे , स्वप्निल चव्हाण आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
देवस्थानचे पुजारी स्वामी परमानंद जंगम यांनी नवीन वर्षाच्या पंचगाचे वाचन करून वर्षभरातील पाऊस, पीके तसेच घडामोडीची माहिती दिली. शिवकाळापासुन सिंहगड भागातील गावोगाव गुढी पाडव्याच्या दिवशी मंदिरात वर्षभराचे भाकित वर्तवले जाते
























