मतमोजणीच्या माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९५० ची सुविधा

पुणे : जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ चारही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होत असून नागरिकांना मतमोजणीविषयक माहिती देण्यासाठी मतमोजणी केंद्रावर संवाद कक्ष तयार करण्यात आला आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या १९५० या टोल फ्री क्रमांकावर  नागरिकांना मतमोजणी विषयक माहिती घेता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

See also  नांदेगाव येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा