महाळुंगे : सहकार महर्षी डॉ. दिलीप मुरकुटे पाटील(शिवसैनिक) संस्थापक अध्यक्ष बाणेर नागरी पतसंस्था (सचिव भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर) यांच्या वाढदिवसानिमित्त महाळुंगे येथे सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि सांप्रदायिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांना समाजसेविका ममताताई सिंधूताई सपकाळ यांच्या शुभ हस्ते ‘श्री भैरवनाथ पुरस्कार’ देऊन तर दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र भुषण समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन आयोजित केले होते.
यावेळी प्रास्तविक करताना डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांनी सांगीतले की, वाढदिवस साजरा करत असताना समाजात वावर करणाऱ्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणे हे कर्तव्य समजून सामाजिक कार्य करण्यास प्रेरणा मिळावी त्यांचा उत्साह वाढावा या हेतूने त्यांना ‘श्री भैरवनाथ पुरस्कार’ देत आहोत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या समाजसेविका ममताताई सिंधुताई सपकाळ दिलीप मुरकुटे पाटील भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणाल्या की, भाऊंच्या समाजकार्याबद्दल किती बोलावे तेवढे कमीच आहे. समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचत त्यांना मदत करण्याचे काम भाऊ सतत करत आहे. समाजाप्रती बांधिलकी भाऊंनी नेहमी जपण्याचे काम केले आहे.
डॉ. दिलीप मुरकुटे पाटील, भगवान खैरे, शिवाजी बांगर हभप पांडुरंग गोळे, राम गायकवाड, ॲड. माणिक रायकर, ॲड. सुदाम मुरकुटे या मान्यवरांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेविका ज्योती चांदेरे, अमर शेडगे (उद्योजक), प्रशांत आबणे (शिक्षक पुरस्कार), गणेश पाडाळे( उद्योजक), पृथ्वीराज कोळेकर (प्रगतशील शेतकरी), हभप भक्ती पाडाळे (मृदुंग वादक) यांना ‘श्री भैरवनाथ पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी माजी सैनिक भगवान खैरे, माजी नगसेवक शिवाजी बांगर, माझी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, मा. पुणे जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, जेजुरी मार्तंड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे, गणपत मुरकुटे, शांताराम पाडाळे, सोपानराव पाडाळे, बेबीताई पाडाळे, काळूराम गायकवाड अशोक कोळेकर, सयाजी गायकवाड, बाळासाहेब भांडे, संतोष तोंडे, शाम बालवडकर, मारुती चांदेरे, ॲड. सुदाम मुरकुटे, राजू शेडगे, किरण मुरकुटे, जयश्री मुरकुटे, युगंधरा मुरकुटे, संग्राम मुरकुटे, अर्जुन शिंदे, अर्जुन ननावरे, गणेश मुरकुटे, जयेश मुरकुटे, विजय विधाते, संजय ताम्हाणे, प्रल्हाद मुरकुटे, जंगल रणवरे, संगीता कोळेकर, ॲड. विशाल पवार, डॉ. सतीश मुरकुटे, दीपलक्ष्मी बेळगावकर, नामदेव गोलांडे, संजय ताम्हाणे, ॲड. दिलीप शेलार, मल्हार मुरकुटे, मेहबूब शेख, शिवाजी चिवे, सूर्यकांत मुरकुटे, योगेश धनकुडे, हभप हरिभाऊ चाकणकर, तसेच सांप्रदायिक क्षेत्रातील विविध मान्यवर आणि महाळूंगे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घर ताज्या बातम्या सहकार महर्षी डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेविका ‘श्री भैरवनाथ पुरस्कार’...