पुण्यातील वाढते अपघात यासाठी पोलीस महानगरपालिका व लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज -खासदार मेधा कुलकर्णी

पुणे : पुण्यातील वाढते अपघात आणि वाहतुकीचे प्रश्न या संदर्भात तोडगा काढण्यासाठी पोलीस खाते,  महानगरपालिका आणि आम्ही लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.

गंगाधाम चौक येथील  झालेल्या अपघातात दिवंगत झालेल्या स्वर्गीय दमयंतीताई सोळंकी यांच्या घरी जाऊन आप्तेष्टांची खासदार मेधा कुलकर्णी यांनी विचारपूस केली.
गंगाधाम चौक या ठिकाणी जड वाहतुकीला दिवसा परत बंदी लागू करणे, उताराच्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे आणि आवश्यक ती अन्य उपाययोजना करणे तसेच रस्ता रुंदीकरण करून रस्त्यातील अनधिकृतपणे केलेले अतिक्रमण हटवून रस्ता रुंद करणे इत्यादी बाबींवर प्रशासनाशी आणि पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार तसेच वाहतूक उपायुक्त श्री. रोहिदास पवार तसेच DCP श्री. राजा यांच्याशी संवाद साधला.


पुण्यातील वाढते अपघात आणि वाहतुकीचे प्रश्न या संदर्भात तोडगा काढण्यासाठी पोलीस खाते,  महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे.

See also  जिल्ह्यात १४ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त