महागड्या स्मार्ट मीटर विरोधात आप’चे आंदोलन

पुणे : शासनाच्या विजेचे स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याच्या धोरणाविरोधात आज आम आदमी पक्षाच्या वतीने महावितरणाच्या रस्ता पेठ येथील मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. श्री राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे जिल्हा विभाग एम.एस. सी. बी कार्यालय यांना आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

शासन काही ठराविक उद्योगपतींच्या हितासाठी स्मार्ट प्रीपेड मीटर लावून नागरिकांची फसवणूक करत आहे. शहरात अनेकदा तासनतास वीज जाण्याच्या घटना होत असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी नागरिकांची लूट कशाप्रकारे करता येईल याचाच विचार शासन आणि राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याचे शासनाच्या भूमिके वरून दिसून येते. विजेच्या प्रीपेड मीटर साठी शासनाच्या वतीने कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करण्याचा घाट घातलेला असून स्मार्ट प्रीपेड मीटर मधून नागरिकांना कोणत्याही नवीन सुविधा मिळणार नाहीत, परंतु नागरिकांना आगाऊ रक्कम भरण्याकरता स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करावे लागणार आहेत. स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची संकल्पना हा एक मोठा घोटाळा असून सरकार हेतू पुरस्कार अशा घोटाळ्यांना खतपाणी घालत असल्याचा आरोप यावेळी आम आदमी पक्षाच्यावतीने करण्यात आला. दिवसेंदिवस वाढणारे विजेचे दर नियंत्रणात अनन्याऐवजी शासनाच्या वतीने अधिकची उधळपट्टी करून ते पैसे देखील उपभोक्त्यांकडूनच वसूल केले जाणार असल्याने नागरिकांनाही याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्ली आणि पंजाब सारखी राज्य वीज फुकट देत असतानाच महाराष्ट्रात मात्र सर्वसामान्य नागरिकांना विजेचे सर्वोच्च दर द्यावे लागत असणे ही एक शोकांतिका आहे असे आम आदमी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी यावेळी सांगितले.

मुकुंद किर्दत, आप राज्य प्रवक्ते: स्मार्ट मीटर म्हणजे ‘ पैसा जनतेचा, मालकी कंत्राटदार अदानी ‘ ची असे धोरण असून मीटर ची अंदाजित किंमत ६००० रुपये असताना १२००० रुपयाने टेंडर दिले गेले आहे हा पैसा जनतेच्या खिशातून वसूल होणार आहे त्या ऐवजी सरकारने वीज गळती, चोरी थांबवून वीजदर कमी करावेत.

See also  सुसगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त दिलीप मुरकुटे यांच्या वतीने ३२ महिला भगिनींचा 'महिला सन्मान पुरस्कार' देउन गौरव

पुणे शहराध्यक्ष श्री सुदर्शन जगदाळे
महाराष्ट्रातील सामान्य जनतेला लुटून, सगळे व्यवसाय अदानी ग्रुप ला देण्यासाठी विद्युत स्मार्ट प्रीपेड मीटर योजना राज्य सरकारने आणली आहे. आम आदमी पार्टी पूर्ण पुणे शहर भर एक ही प्रीपेड मीटर बसू देणार नाही, तसेच एम.एस.सी.बी च्या पुणे शहरांमधील प्रत्येक ऑफिसला कुलूप लावून आंदोलन सुरू करू.

सरकारने स्मार्ट मीटर सामान्य नागरिकांना देण्याचं ठरवलं आहे. यात प्रथम मोठा गैरव्यवहार होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. खाजगी कंपन्यांना मीटर बसवण्याचे टेंडर देऊन हा गैर व्यवहार होत आहे. येत्या काळात परत मोठी वीजबिलात वाढ झाल्याचे दिसून येईल. आम आदमी पार्टी  पंजाब सरकारने प्रायव्हेट थर्मल प्लांट १०८० कोटी रुपयाचा विकत घेऊन एक नवी क्रांती घडवण्याचं काम केलं आहे, परंतु महाराष्ट्रात याच्याविरुद्ध सरकार खासिगीकरण करुन वागत आहे. येत्या विधानसभेत या सरकारला  सामान्य माणूस घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नाही. असे पुणे शहर युवा आघाडी अमित म्हस्के यांनी सांगितले.

सदर आंदोलनास आम आदमी पक्षाच्या वतीने हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.