अजय निम्हण यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

पाषाण : पाषाण येथील सामाजिक कार्यकर्ते अजय निम्हण यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री येथे कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला.

यावेळी खासदार संजय राऊत, शहर प्रमुख गजानन थरकुडे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, शहरप्रमुख संजय मोरे, वैभव दळवी, राजू कांबळे , विकी निम्हण, स्वप्नील मस्के, सत्यम सुर्वे, महावीर पवार, आदित्य दांडेकर, आसिफ बेग, ओंकार निम्हण, मयुर बाणेकर, साईराज सुर्वे, सत्यम सुर्वे आदी उपस्थित होते.

अजय निम्हण हे पूर्वी दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या सोबत शिवसेना पक्षामध्ये कार्यरत होते. पाषाण सोमेश्वर वाडी परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रमातून ते कार्यरत आहेत. आगामी पुणे महानगरपालिका व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोथरूड मतदार संघातील हा प्रवेश महत्वपूर्ण मानला जात आहे.

यावेळी अजय निम्हण यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला.

See also  24x7 पाणीपुरवठा योजनेची खोदाई म्हणजे पुणेकरांसाठी विकतचा मनस्ताप