वसंत मोरे यांनी घेतली शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट

मुंबई: पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे यांनी मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शहर प्रमुख गजानन थरकुडे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, शहरप्रमुख संजय मोरे आदी उपस्थित होते.

आगामी विधानसभा व पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. तसेच लवकरच वसंत मोरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

See also  औंध (जि. पुणे) येथील जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा झालेला मृत्यू प्रकरणी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची सेवा समाप्‍त - आमदार भिमराव तापकीर