पुणे : राज्यातील सीईटी परीक्षांचे निकाल १६ जून २०२४ रोजी प्रसिद्ध झालेले आहेत. सुमारे २० दिवस उलटून गेल्यावर आज ४ जुलै २०२४ रोजीपर्यंत अद्यापही व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक राज्याच्या सीईटी सेल कडून प्रसिद्ध झालेले नाही.
राज्यातील नव्याने सुरु झालेल्या खाजगी विद्यापीठामधील प्रवेश पूर्ण झाल्याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक राज्याच्या सीईटी सेल कडून प्रसिद्ध होणार नाही अशी काळजी घेतली जात आहे.
खाजगी विद्यापीठाच्या तिजोऱ्या भरण्यापेक्षा गरीब व सामान्य विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक राज्याच्या सीईटी सेल कडून प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सांगितले.