गिरगावचौपाटी येथे गणेश मूर्तीं विसर्जनासाठी आलेल्या मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पवृष्टी

मुंबई : अनंतचतुर्दशी निमित्त गिरगावचौपाटी येथे गणेश मूर्तीं विसर्जनासाठी आलेल्या मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पवृष्टी केली व लाखो भाविकांच्या जनसागरात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषात गणरायाला निरोप दिला.

गणेश विसर्जन सोहळ्याचे दर्शन देश-विदेशातील पर्यटकांना घडविण्यासाठी पर्यटन विभागाने उभारलेल्या विशेष #गणेशदर्शनगॅलरी व पोलीस दलाच्या मंडपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत विविध देशांच्या दूतावासाचे प्रतिनिधी व विदेशी पर्यटकांशी संवाद साधला.

गणपतीविसर्जन निमित्त  गिरगाव चौपाटी येथे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री गिरीष महाजन आदी सोहळ्यास उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

See also  मुंबई येथे मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ