स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे व प्रहार चे बच्चू कडू यांची भेट

पुणे : पुणे शहरात छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न झाला. या प्रशिक्षण विविध विषयांवर सत्र घेण्यात आली. या शिबिरात माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर, प्रहार जनशक्ती चे आमदार बच्चू कडू, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, प्रसन्न जोशी, माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात स्वतः संभाजीराजे यांची पूर्णवेळ उपस्थिती होती.

या प्रशिक्षण शिबिरात आमदार बच्चू कडू यांनी स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दोन्ही बाजूने स्वराज्य व प्रहार जनशक्ती युतीबाबत जाहीर चर्चा झाली. या नंतर संभाजीराजे व आमदार बच्चू कडू यांच्या तासभराची बंद दाराआड चर्चा झाली.

See also  निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू - वर्षाराणी मुस्कावाड आर्य समाज पिंपरी येथे राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न