इंडिया आघाडीच्या लोकतंत्र बचाव सभेत सुनिता केजरीवाल यांचे भाषण, तर केजरीवाल यांच्या जेलमधून जनतेला 24 तास मोफत वीज व मोहल्ला क्लिनिक, शिक्षणासह सहा हमी

दिल्ली : नवी दिल्ली येथे इंडिया आघाडीच्या वतीने लोकतंत्र बचाव सभेमध्ये 28 पक्षांनी दिल्लीत एकत्र येत अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध व्यक्त केला.  यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता  केजरीवाल यांनी भाषण केलं.

यावेळी सभेला संबोधित करतांना सुनीता केजरीवाल म्हणाल्या, मोदींना माझ्या पतीला तुरुंगात टाकले. पंतप्रधांनानी योग्य केलं का? केजरीवालांनी राजीमाना द्यावा का? केजरीवाल हे सच्चे देशभक्त आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत. ईडीने त्यांना तुरुंगात टाकलं आहे. पण, खूप काळ ते त्यांना तुरुंगात ठेवू शकणार नाहीत. ज्या हिम्मतीने आणि धैर्याने ते देशासाठी लढत आहेत. स्वातंत्र्यसंग्रामात ज्या पद्धतीने लोकांनी बलिदान दिलं, काम केलं. त्याप्रमाणे अरविंद केजरीवाल देशासाठी काम करत आहेत.

यावेळी सोनिया गांधी, शरद पवार, राहुल गांधी, लालू यादव, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, एमके स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला आदी उपस्थित आहेत.

सुनिता केजरीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांचा संदेश वाचून दाखवला अरविंद केजरीवाल यांचा संदेश

माझ्या प्रिय भारतीयांनो,तुरुंगातून तुमच्या मुलाचा आणि भावाचा तुम्हाला प्रणाम… मी मते मागत नाही. मी कोणाला हरण्याची किंवा जिंकूण देण्याविषयी बोलत नाही. फक्त एक नवा भारत घडणव्यासाठी मदत मागत आहे. १४० कोटी नागरिकांना नवा भरात करण्यासाठी निमंत्रण देत आहेत. भारत हा एक महान आणि गौरवशाली देश आहे. हजारो वर्षाचा इतिहास या देशाला आहे. तरी आपण मागास का आहोत? गरीब का आहेत? मी इथे तुरुंगात आहे. इथे विचार करायला खूप वेळ आहे. मी भारत मातेचा विचार करतो. भारत माता दुःखी आहे. वेदनेने कण्हत आहेत. काण, महागाईमुळे लोकांना दोन वेळचे जेवण मिळत नाही. चांगले शिक्षण मिळत, त्यामुळं भारत मातेला असहाय्य वाटते. काही नेते हायफाय जीवन जगतात, देशाला लुटतात त्यांचा भारत माता द्वेष करते.
केजरीवाल म्हणाले- आपण मिळून नवा भारत घडवूया. असा भारत जिथे प्रत्येक हाताला काम मिळेल. कोणीही गरीब राहणार नाही. उच्च-नीच भेद असणार नाही. प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळेल. सर्वांना चांगले उपचार मिळतील. २४ तास वीज मिळेल. दळवणवळाची सुविधा असेल. चांगले रस्ते असतील. भारत हे जगातील शिक्षणाचे केंद्र असेल. भारताचे अध्यात्म जगामध्ये पसरवेल. सर्वांना न्याय मिळेल. मी देशातील 140 कोटी जनतेला असा भारत बनवण्याचे आवाहन करतो.

See also  पुणे जनसंसद काँग्रेस भाजपच्या उमेदवारांची दांडी!