पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांचा सहकाऱ्यांसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

मुंबई : पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, पुणे जिल्हासंपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शहर प्रमुख गजानन थरकुडे, शहर प्रमुख संजय मोरे तसेच इतर शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी वसंत मोरे यांच्यासोबत मनसे मधील शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये प्रवेश केला.

See also  पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघांच्या 465 फेऱ्या, कशी असणार मतमोजणी? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या? वाचा..