मॉर्डन प्रायमरी इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक विभागांकडून आषाढी एकादशी पालखी सोहळा उत्साहात साजरा

वारजे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉर्डन प्रायमरी इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक विभागांकडून आषाढी एकादशी पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

काही विद्यार्थी वारक्यांच्या, श्री.विठ्ठल व रुक्मिणी व संतांच्या वेशभूषा परिधान करून शाळेचे वातावरण विठ्ठलमय केले . प्रथम मुख्याध्यापिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री. विठ्ठल रुक्मणीच्या प्रतिमेचे व ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाचे  पूजन करण्यात आले.

नंतर पालखीची , संतांची माहिती व पसायदानाचा अर्थ सांगण्यात आला .वारकऱ्यांची ज्ञानोबा – माऊली तुकाराम या जय घोषात पालखी काढून पर्यावरणाचे जागरूकतेसाठी  फलक हाती घेऊन समाजाला झाडे जगवा , जीवन वाचवा , प्लास्टिकचा वापर टाळा , पाणी वाचवा जीवन वाचवा अश्या प्रकारे घोषवाक्ये देऊन विद्यार्थ्याच्या हस्ते दुकानदारांना तुळशीची रोपे देण्यात आली. वारीच्या शेवटच्या  टप्प्यात  झेंडेवाले आणि टाळवाले वारकरी यांचे विठ्ठलाच्या जयघोष करत सुंदर रिंगण घेण्यात  आले .  यासाठी संस्थेचे संचालक श्री. एकबोटे सर ,चेअरमन श्री. शाह सर तसेच व्हिजिटर सौ.पिंपळखरे मॅडम आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. हेमा बर्डे मॅडम यांनी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले .
कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महत्वाचे योगदान दिले.

See also  पाषाण येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न