“काठावर” निवडून आलेल्या सुसंस्कृत पुणे शहराच्या खासदारांनी आधी आत्मपरीक्षण करावे, अजित पवार यांच्यावर टीका खपवून घेणार नाही – अमोल बालवडकर

पुणे : गुन्हेगारांना परदेशात पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या तथाकथित “आकां”च्या सावलीत बसून राजकारण करणाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करू नये, असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिला आहे.
केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर, तेही “काठावर” निवडून आलेल्या सुसंस्कृत पुणे शहराच्या खासदारांनी आधी आत्मपरीक्षण करावे, असे सांगताना बालवडकर यांनी स्पष्ट केले की, तुमच्या विजयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही मोलाचा वाटा आहे, हे विसरू नका.

“गरज सरो वैद्य मरो” ही तुमची नेहमीची संधीसाधू भूमिका आता जनतेसमोर उघडी पडत असून, अशी भूमिका पुण्यासारख्या शहराला शोभणारी नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली.

यापुढे आमचे नेते अजितदादा पवार यांच्यावर अवमानकारक भाषेत किंवा दिशाभूल करणारी वक्तव्ये केली गेल्यास त्याला जसाच तसे उत्तर दिले जाईल, असा थेट आणि स्पष्ट इशाराही अमोल बालवडकर यांनी दिला आहे.

राजकारणात मतभेद असू शकतात; मात्र खालच्या पातळीवरील आरोप, व्यक्तिगत टीका आणि दिशाभूल सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी यावेळी दिला.पुण्यातील जैन बोर्डिंग च्या आर्थिक गैरव्यवहार घोटाळ्याची आठवण करून देतो ‘जय जिनेंद्र!’ असा उल्लेख ही यावेळी बालवडकर यांनी केला.

See also  बालेवाडी येथील क्रीडा संकुलात राज्यस्तरीय बँड स्पर्धा उत्साहात संपन्न