पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने विजय संकल्प मेळाव्यात भाजपावर जोरदार टीका

पिंपरी  : पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने विजय संकल्प मेळावा घेण्यात आला यावेळी प्रामुख्याने भाजपाला लक्ष करत भाजपा भ्रष्टाचारी झाल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी केला.

पिंपरी चिंचवड येथे विजयी संकल्प मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार बजरंग सोनावणे, आमदार रोहित पवार, पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष तुषार कामठे, सुलक्षणा धर, अजित गव्हाणे, अझम पानसरे, मेहबूब शेख, सुनील गव्हाणे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, उद्योग व्यवसाय मुंबईत होते. त्यावेळी ते काही बाहेर घेऊन जावेत अशी यशवंतराव चव्हाणांची इच्छा होती. त्याचवेळी जमशेदपूर येथे टाटा कारखाना असताना एक ऑटो कारखाना काढण्याचा विचार जमशेदजी टाटा करत होते. त्याचवेळी यशवंतराव चव्हाणांनी जमशेतजी टाटा यांना विनंती केली की तुम्ही जमशेदपूर नाही तर पुण्याला कारखाना काढा अशी विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. आणि पहिला ऑटो मोबाईलाच पहिला कारखाना इथ आला अशी आठवण शरद पवारांनी यावेळी सांगितला. ते पिंपरी चिंचवड येथे विजयी संकल्प कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, त्यांनी पिंपची चिंचवड येथे कसे उद्योग व्यवसाय आले याचा इतिहासच मांडला.

यशवंतराव चव्हाणांनी दुसरी विनंती केली कमलनयन बजाज यांना. ऑटो मोबाईलमध्ये ज्यांना जायचं होत त्यांना यशवतंराव चव्हाणांनी विनंती केली. त्यानंतर आज बजाज ऑटोसह अनेक छोटो मोठे व्यवसाय उभा राहिले असं ही पवार यावेळी म्हणाले. टाटा उद्योगसमूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांची आठवण काढत शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड कसे उद्योग व्यवसाय आले याचा इतिहासच वाचला. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी विनंती केल्यानंतर जमशेदजी टाटा यांनी दुसऱ्या राज्यात जात असलेला उद्योग महाराष्ट्रात म्हणजे पिंपरी चिंचवडला आणला अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

See also  अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून कोथरूड परिसरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नाव नोंदणी करणाऱ्या महिलांना साडी भेट

आमदार रोहित पवार म्हणाले, येत्या डिसेंबर महिन्यात शरद पवार  यांचा 85 वा वाढदिवस होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही ठरवलय आम्हाला महाविकास आघाडीत किती जागा मिळतील हे वरिष्ठ नेते ठरवतील. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुमारे 85 आमदार निवडून आणायचे आहेत. असं म्हणत मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे पिंपरी चिंचवड आणि भोसरी  हे तीनही विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे असावेत अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी यावेळी केली. ते पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रमात बोलत होते. तसंच, आमदारच नाही तर महानगरपालिकेतही आपले 85  जागा आपल्याचं असायला हव्यात.

आमचा कार्यक्रम सुरु होताना अनेक लोकांना या कार्यक्रमाला यायचं होतं. परंतु, येथे काही पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना आतमध्ये येऊ दिलं नाही. ही काही सत्ताधाऱ्यांची सभा नाही. शरद पवारांवर प्रेम असणारे हे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत. परंतु, लक्षात ठेवा फक्त तीन-ते चार महिन्यांचा कालावधी राहीलाय. त्यानंतर आमची सत्ता येणार आहे. आज जर असं वागत असतील तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही असा थेट इशाराच रोहित पवारांनी यावेळी पोलिसांना दिला आहे.

जयंत पाटील म्हणाले, भ्रष्टाचारात सत्ताधारी भाजपने कळस गाठलाय. सध्या निवडणूका तोंडावर आहेत. त्यामुळे जनतेसमोर खरी परिस्थिती घेऊन जाणं विरोधी पक्षनेते म्हणून आमचं काम आहे असं म्हणत आता एक नवीन नारा आलाय. तो म्हणजे जेल’पेक्षा भाजप बरा असा हा नारा आहे.

यावेळी प्रास्ताविक तुषार कामठे यांनी केले तर सुलक्षणा धर व अजित गव्हाणे यांनी आपले विचार व्यक्त केले.