पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळवण्याचा प्रयत्न कर्नाटक राज्याकडून होत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला कन्नड येत नसल्याने त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. कन्नड रक्षक वेदिकेच्या उन्माद कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे सीमा भागातील लोकांमध्ये संतापाची लाट पसरली असून पुणे शहरातही मुजोर कन्नडिगांचा शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष्मीनारायण टाॅकिज चौकात कर्नाटक राज्याच्या बसला काळे फासून केला आहे.
शिवसैनिक बस स्टॅन्डमधे घुसल्यावर कर्नाटकच्या बसचे ड्रायव्हर घाबरून पळून गेले. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामधे विभागप्रमुख सूरज लोखंडे, युवासेना अधिकारी राम थरकुडे, समन्वयक युवराज पारीख, परेश खांडके, हर्षद ठकार, मकरंद पेठकर, अनिल दामजी, गिरीश गायकवाड, सौरभ ढेबे, गणेश घोलप, जुबेर तांबोळी, समीर खान, पंकज परदेशी उपस्थित होते. मोठा पोलीस बंदोबस्त असताना शिवसैनिकांनी बसला काळे फासले.