पुणे,ता. ३: पुण्यातील सुप्रसिध्द ‘सोमेश्वर फाऊंडेशन’ तर्फे आयोजित ‘कार्यसम्राट मोफत महा- आरोग्य शिबीर’ दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमीत्त २२ जुलै पासून विविध टप्पात सुरू आहे . यातील तीसरा टप्पा म्हणजे, ‘मुख्य शिबीर’ रविवार (ता.४) ऑगस्ट, सकाळी ९ वाजल्यापासून शासकीय कृषी महाविद्यालय मैदान, सिंचन नगर, शिवाजीनगर या ठिकाणी होणार आहे. या शिबीराची जय्यत तयारी झाली असून सर्व पक्षीय मान्यवरांच्या उपस्थितील शिबीराचे उदघाटन शासकीय कृषी महाविद्यालय मैदान, सिंचन नगर, शिवाजीनगर या ठिकाणी होणार आहे. सकाळी ९ ते सायं ४ वाजेपर्यंत जगविख्यात डॉक्टरांचा सल्ला, तपासणी, औषधोपचार केले जाणार आहेत. चौथा टप्पा: ५ ऑगस्ट ते ५ ऑक्टोंबर या दरम्यान महाआरोग्य शिबीर पश्चात शिबीरात शस्रक्रिया अथवा उपचार याकरिता नोंद किंवा निवड करण्यात आलेल्या रूग्णांना लाभ देणेकामी उपायोजना व कार्यपूर्ती होईल.
लोकप्रिय उपमुख्यमंत्री, माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते रविवार दिनांक 04 ऑग्स्ट 2024 रोजी, सकाळी 9 वाजता कृषी महाविद्यालयाचे मैदान, सिंचन नगर, भोसलेनगर, पुणे याठिकाणी कार्यसम्राट मोफत महा – आरोग्य शिबीराचे उदघाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री मा.ना. श्री.अजितदादा पवार हे असणार आहेत. प्रमख पाहुणे नागरी विमान वाहतूक आणि सहकार मंत्रालयाचे राज्यमंत्री, मा.ना.श्री.मुरलीधर मोहोळ, विधानपरिषद उपसभापती महाराष्ट्र राज्य निलमताई गोऱ्हे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.श्री.चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजय वडेट्टीवार, ग्रामविकास मंत्री मा.ना.श्री.गिरीशभाऊ महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना.श्री.हसन मुश्रीफ, कृषी मंत्री मा.ना.श्री.धनंजय मुंढे, आरोग्य मंत्री मा.ना.डॉ.तानाजी सावंत, उद्योग मंत्री मा.ना.श्री.उदय सामंत, शिवसेना उपनेते सचिन अहिर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे तसेच पुणे शहरातील सर्व आमदार, माजी नगरसेवक आदी सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित असणार आहेत.
शिबीराचे वैशिष्टे –
* विनामुल्य आरोग्य शिबीरात सर्व पॅथींचा समावेश.
ॲलोपॅथी, आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, युनानी), दंतचिकीत्सा इत्यादी तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया व औषधी विनामुल्य उपलब्ध
* देशातील नामवंत तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती.
डॉ.तात्यासाहेब लहाने, डॉ.वाकणकर, डॉ.गौतम भंसाळी, डॉ.रमाकांत देशपांडे, डॉ.के.एच संचेती, डॉ.विकास महात्मे, डॉ.यशराज पाटील, डॉ.अजय चंदनवाले, डॉ.संजयकुमार तांबे, डॉ.जगन्नाथ दिक्षीत, डॉ.अमित मायदेव, डॉ.अजय चौरसिया इत्यादी…..
* विविध आजारांवरील उपचार
एकुण 80 बाह्यरुग्ण कक्षांचा समावेश
सदरील बाह्यरुग्ण कक्षांत आयुष, नेत्रचिकीत्सा, दंतचिकीत्सा, कान नाक घसा, जनरल मेडीसीन, जनरल सर्जरी, हृदयरोग, श्वसनविकार, मुत्ररोग, प्लॉस्टिक सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, अनुंवशीक विकार, कर्करोग, लठ्ठपणा, वृध्द जनरल तपासणी, मतीमंद रुग्ण तपासणी, मनोविकार, मेंदुरोग इत्यादी आजांरावर विनामुल्य औषधोपचार व शस्त्रक्रिया
त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या आवश्यक रक्त व लघवी चाचणी नमुणे संकलन, तसेच इ.सी.जी, मॅमोग्राफी, पी.एफ.टी., बी.एम.डी. तपासणी