बालेवाडी येथील अष्टविनायक चौक ते वाटीका सोसायटी पर्यंत रस्त्यावर साठणाऱ्या पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात

बालेवाडी : बालेवाडी येथील अष्टविनायक चौक ते वाटीका सोसायटी पर्यंत पावसाचे रस्त्यावरील पाणी पावसाळी गटारीत पाणी न जाता रस्त्यावर तुंबते.

या रस्त्यालगत असलेल्या इलेक्ट्रिक डक्ट मधून ओरवी सोसायटीच्या बेसमेंट मध्ये जमा झाले आहे. पावसाळी गटारींचे काम अर्धवट असल्याने दरवर्षी ओरवी, वाटीका व प्रायमा डोमस सोसायट्यांतील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी येथील रहिवासी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करतात पण याकडे दुर्लक्ष केले जाते. यातच वाटीका सोसायटीजवळ मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. येथील रहिवाशांनी सांगितले की आठवडी बाजारातील कचरा येथे टाकला जातो. त्यामुळे अरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. ओरवी सोसायटीच्या बेसमेंट मध्ये सतत पाणी जमा होत असल्याने त्यांच्या सोसायटीत डेंग्यू तापाचे आजार होत आहेत. सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे ओरवी सोसायटीच्या भिंतीला धोका संभवतो.


याच रस्त्यावर पुढे इलेक्ट्रिक बॉक्स आहे त्याभोवती पाणी साठल्याने एखादी दुर्घटना घडू शकते. याबाबतीत बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे सहाय्यक आयुक्त, औंध वार्ड ऑफिसला कळविण्यात आले आहे व यावर स्थायी उपाय योजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे मोरेश्वर बालवडकर, रमेश रोकडे, आशिष कोटमकर, इंद्रजित कुलकर्णी, दफेदार सिंह, अजित धात्रक , प्रदिम पाटणकर व तीन्ही सोसायटीचे कमेटी मेंबर्स व पत्रकार यांनी पहाणी करून वरील प्रमाणे मागणी केली आहे.

See also  नववर्षाच्या प्रारंभीच भारताची अवकाश भरारी