येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदी व कर्मचाऱ्यांसाठी नेत्र तपासणी शिबीर संपन्न

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृह, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंदी व कर्मचारी यांची मोफत नेत्र, मोतीबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

यावेळी अपर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक अनिल खामकर, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे संचालक परवेज बिलिमोरिया, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे अध्यक्ष संकेत शहा उपस्थित होते.

सुधारणा व पुनर्वसन या धोरणा अंतर्गत कारागृहातील बंद्यांकरीता अशासकीय संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या नेत्र तपासणी शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून बंदी तसेच कर्मचारी यांची नेत्र तपासणी करण्यात येऊन उपचार करण्यात आले. तसेच चष्मा आवश्यक असलेल्या बंद्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या नेत्र तपासणी शिबिरात एकूण १५९ बंद्यांची तसेच २५ कारागृह कर्मचाऱ्यांनी या नेत्र तपासणी शिबीराचा लाभ घेतला.

See also  पुणे जिल्ह्यात ‘आनंदाचा शिधा’चे ७३ टक्के वितरण