अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने कोथरूड येथे महिलांचा मेळावा

कोथरूड : कोथरूड विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना नावनोंदणी अभियान अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आले असून  सदरील अभियानात नावनोंदणी करणाऱ्या महिला भगिनींचा मेळावा आशिष गार्डन, डी. पी. रोड, कोथरूड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी उपस्थित सर्व महिलांशी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी संवाद साधला आणि येथून पुढेही असेच अनेकविध उपक्रम राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. दरम्यान उपस्थित अनेक महिला भगिनींनी यावेळी अमोल बालवडकर यांच्यासोबत सेल्फी देखील घेतला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महिलांसाठी करण्यात आले होते.

See also  शेतकरी व शेतकऱ्यांचे पोरं हीच माझे इलेक्ट्रॉल बॉंड आहे सुसगाव येथील प्रचारात राजू शेट्टी यांचे प्रतिपादन