नवीन पिढीचे नवं राष्ट्र भक्तीगीत म्हणून ‘विकसित भारतम्’ची नोंद होईल: शीतल पाटील

पुणे: विद्यार्थ्यांच्या जिवावर आपल्याला विश्वगुरू व्हायचे आहे. “वंदे मातरम्”, “जन-गण-मन” ही जशी राष्ट्रगीते आपल्याला प्रचंड प्रेरणा देणारे स्त्रोत आहेत. त्याप्रमाणे आजच्या तरुण पिढीला त्यांना आवडणार्‍या भाषेत, त्यांना आवडणार्‍या सांगीतिक पढीतीमध्ये माला लिहावेसे वाटले. नवीन पिढीचे नवराष्ट्र भक्तीगीत व्हावे अशी ऊर्जा, ताकत या गाण्यात आहे असे प्रतिपादन यशवंत इंस्टिट्यूटचे संस्थापक संचालक शीतल पाटील यांनी केले.

यशवंत इंस्टिट्यूटतर्फे विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी “विद्यार्थी हिताय,पालक सुखाय!’ या व्याख्यानमालेचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे रविवारी करण्यात आले होते. याच कार्यक्रमात शीतल पाटील लिखित, दिग्दर्शन, निर्मिती केलेले आणि भूषण विश्वनाथ यांनी सुरेख आवाजात गायलेले ‘विकसित भारतम्’ या नव्या पिढीचे नवीन राष्ट्रभक्ती गीत व्हिडिओचे राष्ट्रार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रेरणादायक व्याख्याते डॉ. भावेश भाटीया व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी गायक भूषण आणि गाण्यासाठी चित्रण केलेल्या आर्यन स्कूल च्या विद्यार्थ्यांचे यावेळी सन्मान करण्यात आला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आतापर्यंतच्या उपलब्धि आणि त्यांच्या संकल्पनेतील २०४७ मधील विकसित भारताचे स्वप्न शब्दश: हे गीत शब्दबध्द केले असून देशभरातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या तसेच युवा वर्गाच्या काळजाला हात घालेल असे हे सुरेख संगीत आणि अर्थपूर्ण चित्रणही केले आहे. मोदीजींच्या प्रती परम आदर आणि त्यांच्या विकसित भारताचा संकल्प प्रत्येक शालेय विद्यार्थ्यापर्यंत पोहचलाच पाहिजे या भावनेने हे शब्द आणि कल्पना मला सुचली असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. आजचा जमाना सोशल मीडियाचा आहे. म्हणूनच देशभक्ति, शिक्षण, विकसित भारत या विषयांना समर्पित तसेच विद्यार्थी आणि पालकांचे हित जपणारे एक यूट्यूब चॅनेल असावे यासाठी ‘म्युझिलोक’ या चॅनल ची निर्मिती केली आहे. याच शृंखलेतील ‘विकसित भारतम्’ हे गीत लिहिले असल्याचे पाटील यांनी संगितले.

या गीताचे कौतुक भावेश भाटीया यांनी देखील केले. ते म्हणाले की, ‘विकसित भारतम्’ हे गीत एक संजीवनी आहे. तसेच ते क्रांति गीत असून रिपब्लिक परेड च्या वेळी ते गायले जाईल.

See also  आर्ट ऑफ लिव्हिंगसमवेत जलयुक्त शिवार आणि नैसर्गिक शेतीचा सामंजस्य करार