बाणेर : बाणेरच्या राजकारणातील अजातशत्रू असलेले भाजपाचे नेते ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस प्रल्हाद सायकर यांच्या वाढदिवसानिमित्त बाणेर परिसरातील सर्व पक्षीय राजकीय नेते शुभेच्छा देण्यासाठी एकवटले यावेळी बाणेर चा नगरसेवक कोण होणार यावर हास्य विनोदासह चर्चा रंगली होती.
यावेळी प्रल्हाद सायकर यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर, काँग्रेस पक्षाचे अमर लोंढे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, लहू बालवडकर, गणेश कळमकर, सुभाष भोळ आदी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रल्हाद सायकर व सुभाष भोळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वपक्षीय बाणेर बालेवाडी परिसरातील राजकीय महत्त्वाचे कार्यकर्ते एकत्रित आले.
बाणेरच्या राजकारणाचे वैशिष्ट्य नुसार एकमेकांच्या विरोधात लढणारे नेत्यांनी सुद्धा कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र येत भावी नगरसेवक होण्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी अमोल बालवडकर यांना मागील निवडणुकीत मदत करणारे राहूल बालवडकर यंदा राष्ट्रवादी कडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. तर प्रल्हाद सायकर यांच्या पत्नी स्वप्नाली सायकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून लघु बालवडकर यांच्या पत्नी निवडणूक लढल्या होत्या. ते सध्या भाजपामधून इच्छुक आहेत यामुळे प्रल्हाद सायकर अथवा गणेश कळमकर यांच्यापैकी कोणाला तिकीट मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
राजकारणामध्ये कधीच कोणी कायमचा शत्रू नसतो हीच बाब या निमित्ताने अधोरेखित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी प्रल्हाद सायकर सर्वपक्षीय शुभेच्छा स्वीकारताना काहीसे गहिवरले.
राजनेती में दुश्मनी जैम के करो, लेकीन येह गुंझाहीश रहे ,
जब कभी हम दोस्त हो जाये तो
शरमिंदा ना हो| अशा प्रत्यय दर्शवणारी ही भेट स्थानिक राजकारणामध्ये आपले व्यक्तिगत संबंध जपण्याला प्रत्येक जण प्राधान्य देत असल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे.