मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे कात्रज चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव कात्रज चौकात उपस्थित होते महिलांची संख्या देखील लक्षणीय पाहायला मिळाली. जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली.
यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, महाराष्ट्रात मराठे एक नाहीत असे ज्यांनी हीनवले त्यांना पुणेकरांनी दाखवून दिले, त्यांची पाठ थोपटायला हवी. दोन-चार दिवसापूर्वी आपल्या समाजाला खूप हिनवलं पण पुणेकरांनी एकजूट दाखवून दिली आहे. आरक्षण मिळेपर्यंत मला साथ द्या, मागे हटू नका, मी हटत नाही अशीच एकजूट दाखवा. मला यांनी घेरायचं ठरवलं आहे, पण छाताडावर पाय ठेऊन पुढे जाऊ.
पुण्यातील सारसबाग शनिवारी वाडा डेक्कन परिसरात 9तास रॅली निघाली. लाखोंच्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता.