दोन दिवसांमध्ये राजाराम पुलाचे चे उद्घाटन न केल्यास आम आदमी पार्टी सामान्य माणसाच्या हस्ते उद्घाटन करून रहदारीसाठी पूल खुला करेल: आप चा इशारा

कोथरूड  : आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सिंहगड रोडवरील राजाराम पूलाची पाहणी केली. सदरच्या पुलाचे काम डाम्बरीकरणाचे सर्व थर झालेले असून त्यावर ती पांढरे पट्टे मारून झालेले आहेत त्यामुळे आता हा पूल कुणाची वाट पाहतोय असा प्रश्न आहे. प्रशासनाने श्रेय घेण्याच्या राजकारणात सहभागी न होता सामान्य माणसाची अडचण समजावून घेऊन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने हा पूल खुला करावा. अन्यथा आम आदमी पार्टी सामान्य नागरिकाच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करून वाहतुकीसाठी हा पूल खुला करेल.

मुळात नगर नियोजन चुकल्यामुळे सिंहगड रोडला पर्यायी रस्ता नाही अशात हा पूल वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बांधण्यात आला परंतु अजूनही तो वापरास खुला झालेला नाही.
त्यामुळे सिंहगड रोडवरची वाहतूक कोंडी हा रोजचा विषय झाला आहे. शनिवारी अनेक जणांनी या वाहतूक कोंडीचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले होते त्यामुळे आज आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत,धनंजय बनकर ,निलेश वांजळे, सतीश यादव ,अक्षय शिंदे सुरेखा भोसले, प्रशांत कांबळे, सुनिता काळे, अनिल कोंढाळकर ,उमेश बागडे ,शिवराम ठोंबरे ,सत्यवान शेवाळे , सुनील सौदी यांनी या पुलाची पाहणी केली व पूल चालू करण्याबाबत इशारा दिला.

See also  जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गतीउत्तम नियोजनाद्वारे चालू आर्थिक वर्षात १०० टक्के खर्च