भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 28 व एकता सेवा प्रतिष्ठाण च्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा

पुणे : भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 28 व एकता सेवा प्रतिष्ठाण च्या वतीने सालाबादप्रमाणे गुलटेकडी चौक ,सुयोग सेंटर येथील उभारण्यात आलेल्या ध्वज स्तंभवर भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते पुष्पा कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वीरपत्नी  दिपाली मोरे यांचा सन्मान करण्यात आला
बालगोपाळांना खाऊ वाटून ७८ वा स्वतंत्र दिनाच्या च्या शुभेच्छा देण्यात आल्या.स्वतंत्र साठी आपल्या देशाचे असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली या सर्वांना स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण या सर्वांचे शतशः ऋणी राहुयात असे गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने मनोगत व्यक्त गणेश शेरला यांनी केले. व सर्व प्रमुख मान्यवरांनी नागरिकांना ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रतिष्ठाणच्या वतीने
अध्यक्ष गणेश शेरला , तुकाराम डुबेकर , सचिन खंडागळे ,किरण वैष्णव,धनराज गवळी,दिपक सांळुके,मारुती कांबळे ,
नझीर शेख, संजय साठे, महेश साळुंखे ,अजय शिंदे,रुपेश राजभर ,अक्षय मदने, पवन शेंडगे  यांच्या परिश्रमातून ध्वजा रोहनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

     

See also  मातीकला वस्तुंचे राज्यस्तरीय प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्धाटनग्राम विकासाला प्रोत्साहन, चालना देणाऱ्या उपक्रमाची गरज- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील