पुणे – भारतीय जनता पक्षाने कसबा विधानसभा मतदारसंघात महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते. १५ दिवस चाललेल्या या शिबिरात १२ हजारहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली तसेच चष्मे वाटपही करण्यात आले, अशी माहिती शिबिराचे संयोजक हेमंत रासने यांनी दिली.
दिनांक १ ते १५ ऑगस्ट या काळात कसबा विधानसभा मतदारसंघात १५ ठिकाणी आरोग्य तपासणीची व्यवस्था केली होती. महिलांसाठी कर्करोग तपासणी, तोंडातील कर्करोग तपासणी, नेत्र आणि दंत तपासणी, छातीचा एक्सरे, रक्त तपासणी, कोलेस्टेरॉल तपासणी, रक्तदाब आणि शुगर तपासली अशा १० हजार रुपयापर्यंतच्या तपासण्या महिलांसाठी मोफत करण्यात आल्या. राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.