‘एक धाव सुरक्षेची’ अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

पुणे, दि. १९: जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली  आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने ‘एक धाव सुरक्षेची’ या उपक्रमांतर्गत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. 

पोलीस अधीक्षक कार्यालय मैदान येथे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. पाषाण सर्कल मार्गे पोलीस अधीक्षक कार्यालय मैदान येथे स्पर्धेचा समारोप झाला.

नागरिकांमध्ये आपत्तीसंदर्भात जनजागृती व्हावी, त्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पूर, दरड कोसळणे, भूकंप, सचेत व दामिनी अॅप, टोल फ्री ११२, १०७७ या क्रमाकांबाबत जनजागृती करण्यात आली. 

या स्पर्धेमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल, आपदा मित्र, पोलीस, गृहरक्षक दल, जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी अशा १९४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच मॅरेथॉन स्पर्धेतील पुरुष व महिला गटाच्या विजेत्यांना पदक देण्यात आले आहे.

See also  आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी एकजुटीने कार्य करावे -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर