सोमेश्वरवाडी येथे राज ठाकरे यांच्या हस्ते मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सोमेश्वरवाडी : "मनसेचे युवानेते, सोमेश्वरवाडीचे शाखाध्यक्ष शिवम दळवी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना शिवम दळवी म्हणाले की, नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी हे कार्यालय सुरू केले आहे.

याप्रसंगी मनसेचे नेते बाबु वागसकर, वसंत मोरे, किशोर शिंदे, पुणेउपशहर अध्यक्ष सुहास निम्हण, मुळशी विद्यार्थी सेनेचे अनिल मातेरे, विभागाध्यक्ष सुधिर धावडे, उपविभागाध्यक्ष पांडुरंग सुतार, अनिकेत मुरकुटे, रमेश उभे, संजय काळे, शाखाध्यक्ष जितेंद्र कांबळे, अशोक मराठे, मयूर सूतार, किरण जाधव, किरण उभे, संदीप काळे, अमित राऊत, अभिजीत चौघुले, किरण रायकर, परिसरातील मनसे सैनिक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन पाषाण सोमेश्वरवाडी, सुतारवाडीमधील मनसेचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी केले होते.

See also  कुस्ती संघाच्या अध्यक्ष ला अटक करावी या महिला कुस्तीगिरांच्या मागणीला पाठिंबा देत आपची निदर्शने !