पुणे : औंध बालेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते संग्राम मुरकुटे यांनी अनोख्या पध्दतीने रक्षाबंधन साजरे करत , प्रभागातील ५०० हुन अधिक महिलांकडून राखी बांधून घेतली. या सर्व महिलांना साड्या ओवाळणी म्हणून वाटण्यात आल्या.
औंध येथील संग्राम मुरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात या अनोख्या रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना , संग्राम मुरकुटे म्हणाले , “बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणून , आपण सर्वजण रक्षाबंधन साजरे करतो. भावाने बहिणींच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असावे असा मतितार्थ या सणामागे आहे. माझ्या प्रभागातील सर्व महिला-भगिनींच्या अडीअडचणी सोडविणे हे माझे त्यांचा एक बंधू म्हणून आद्य कर्तव्य आहे.याच प्रामाणिक भावनेतून आज हा रक्षाबंधन सोहळा आम्ही सर्वजण साजरा करत आहोत.इथून पुढे देखील मोठ्या प्रमाणात हा उपक्रम सुरू ठेवण्याचा माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न असेन.”
या रक्षाबंधन सोहळ्याला , राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्यासह औंध-बालेवाडी भागातील महिला , भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.