माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक स्मारकाच्या सुशोभिकरण कामाचे भूमीपूजन संपन्न

पुणे :  आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार विशेष निधीतून छत्रपती शिवाजीनगरमधील म्हसोबा गेट चौक येथील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक साहेब यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरु करण्यात आले असून याचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न झाला. सदर काम हे एकूण १० लक्ष रुपयांचे आहे.

आज या भूमीपूजनावेळी स्व वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास हार अर्पण करीत त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी गोर सेना, पुणे शहर, अध्यक्ष राज चव्हाण, पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश राठोड, कार्याध्यक्ष चंदन ननावत, उपाध्यक्ष मल्लेश पवार, पक्ष सदस्य रमेश चव्हाण, गोर बंजारा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझ्या छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात स्व वसंतराव नाईकांचे स्मारक असणे हे माझ्यासाठी भाग्याचे असून या स्मारकाच्या विकासासाठी माझा हातभार लागत आहे, याचा मला आनंद आहे, अशा भावना यावेळी शिरोळे यांनी व्यक्त केल्या.  येणाऱ्या काळात या स्मारकाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही आणि हे स्मारक भव्यदिव्य स्वरूपात दिसेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

See also  बौद्ध उद्योजकांना स्थानिक ते जागतिक पातळीवर व्यवसायाची संधी – सुनील माने