बालेवाडी : बालेवाडी येथील श्री खंडेराय प्रतिष्ठानचे ज्ञानसागर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च कडून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती अतिशय उत्साहात साजरा करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचीअस्मिता जागवणारी शिव गीते व महाराष्ट्र गीते गाऊन तसेच शिव विचार सांगून शिवजयंती साजरा केली. छत्रपती शिवरायांचे कार्य, आचार, विचार व प्रसंगवधान सर्वांनाच नेहमी प्रेरणादायी आहे .छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी आपली ध्येय गाठली पाहिजेत असे गौरवोदगार श्री खंडेराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर यांनी यावेळी काढले.
यावेळी डीआयएमआर चे संचालक डॉ.साजिद अल्वी आणि श्री खंडेराय प्रतिष्ठानचे सचिव डॉ.सागर बालवडकर उपस्थित होते .सदर जयंती महोत्सवाचे आयोजन एमबीए च्या विभाग प्रमुख डॉ.मनीषा जगताप यांनी डॉ. असिता घेवारी, ग्रंथपाल श्री सुंदर पाचकुडवे , प्रा.प्रियांका देसले , काजल इंगळे यांच्या समवेत व संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहकार्याने पार पाडले.