“पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा  फासणाऱ्या  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरीत राजीनामा द्यावा ” – अरविंद शिंदे शहराध्यक्ष पुणे शहर कॉंग्रेस

पुणे : पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने झाशीची राणी पुतळा ,बालगंधर्व चौक  पुणे येथे बदलापूर येथील शाळेत लहान मुलीवर झालेल्या बलात्काराच्या  निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे  म्हणाले महाराष्ट्र ही थोर संतांची भूमी आहे आणि या  भूमीत  लाडक्या बहीणी व मुली असुरक्षीत आहेत समाज तसेच राज्य सरकारने याबाबत  सतर्कता  बाळगण्याची गरज आहे.महिला विरोधी अत्याचारांच्या गुन्ह्याची तातडीने चौकशी व्हायला हवी तसेच अशा पद्धतीने विकृत व क्रूर कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी अशी कृत्ये करणाऱ्यांना कठोर शिक्षेची भीती असायला व्हावी, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस बलात्कारी रांज्या पाटलाचा हात-पाय कापून त्याचा चौरंगा केला होता अशी शिक्षा त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली होती अशीच शिक्षा आजच्या या विकृत नराधमांना दिली तर  आपल्या आया बहीणी सुरक्षित राहतील.बदलापूर येथील  पीडीत कुटुंबीयानी पोलिसांकडे तक्रार दिली असताना पोलिसांनी FIR  दाखल करायला दोन तास विलंब केला.शाळेच्या व्यवस्थापन समितीचे भाजपचे पदाधिकारी असल्यामुळे पोलिसांनी FIR दाखल करायला दिरंगाई केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असताना अशा प्रकारच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात होत आहेत  याची नैतिक जबाबदारी घेऊन त्वरीत राजीनामा द्यावा  अशी मागणी या आंदोलनाद्वारे आम्ही करत आहोत.यानंतर महाराष्ट्राचे माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे व माजी महापौर कमल व्यवहारे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निषेधाची भाषणे झाली.यावेळी शिक्षण मंडळ माजी अध्यक्षा संगिता तिवारी, मुक्तार शेख ,मनिष आनंद ,ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज ,सुजित यादव ,अक्षय माने रमेश‌ सोनकांबळे ,अजित जाधव ,रमेश सकट ,युव अध्य‌क्ष सौरभ अमराळे सेवादलाचे प्रकाश पवार ,द.स. पोळेकर ,संतोष आरडे ,घनश्याम निम्हण , सतीश पवार ,संदिप मोकाटे ,नूर शेख ,  रवि आरडे ,आशीतोष शिंदे ,ॲड. राजश्री अडसुळ ,सुंदर ओव्हाळ ,‌शोभना पण्णीकर ,छाया जाधव ,नलिनी दोरगे ,रजिया बल्लारी ,सुनिता नेमूर ,बेबी राऊत ,हर्षद हांडे ,विश्वास दिघे लतेंद्र भिंगारे ,डॉ . रमाकांत साठे ,अशोक लोणारे ,महेश विचारे ,कृष्णा नाकते  आदीसह असंख्य कॉंग्रेस पदाधिकारी व‌ कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

See also  चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजपा अंतर्गत राजकीय उलथापालथ होण्याच्या चर्चा