सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित “महिला सशक्तीकरण” आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 योगदिन उत्साहात साजरा.

सोमेश्वरवाडी : जागतिक योग दिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने सोमेश्वरवाडी येथील गोविंद मंगल कार्यालय येथे  “महिला सशक्तीकरण” आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या शिबिराचे उद्घाटन उपस्थित ज्येष्ठ नागरिक व योग प्रशिक्षक मनीषा सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आले. या विशेष योग शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 2014 ला योगासनाला आंतरराष्ट्रीय महत्त्व मिळवून दिले. निरोगीपणाला प्रोत्साहित करणारी आपली प्राचीन उपचार पद्धती जगाने स्वीकारली आहे. आपल्या दैनंदिन जीवनशैलीशी संबंधित विकारांवर रामबाण उपाय म्हणजे योग! म्हणुनच सर्वांनीच योगाचे महत्त्व जाणून आपल्या जीवनात योगासन केले पाहिजे. : सनी निम्हण (माजी नगरसेवक)

यावेळी परिसरातील नागरिकांसोबत शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील योग दिनानिमित्त योगासन करत योगाचे महत्व जाणून घेतले.

See also  पुण्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ "आप" चे आंदोलन