भाजपाचे बाणेर मध्ये अनोखे रक्षाबंधन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून महिला सफाई कर्मचाऱ्यांना अनोखी भेट

बाणेर : बहीण-भावाचं नातं दृढ करणारी राखी पौर्णिमा बुधवारी घरोघरी उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या बांधवांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली‌. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून बाणेर मध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. 

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून बाणेर-पाषाण लिंक रोड येथील ऑकेजन्स हॉल येथे सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपला परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई महिला कर्मचाऱ्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच, ओवाळणी म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या.

यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, लहू बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, गणेश कळमकर, राहुल कोकाटे, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, उत्तर मंडल सरचिटणीस उमाताई गाडगीळ, महिला मोर्चाच्या अध्यक्षा अस्मिता करंदीकर, युवा मोर्चा अध्यक्ष रोहन कोकाटे, दक्षिणचे सरचिटणीस दीपक पवार, विवेक मेथा यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचलन सुभाष भोळ यांनी केले आणि सचिन दळवी यांनी आभार मानले.

See also  बाणेर येथे भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थी संसद परिषद