मुळशीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बदलापूर घटनेचा विरोध

पुणे : शिवशक्ती चौक घोटवडे फाटा तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बदलापूर येथे नुकतीच जी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख शंकर भाऊ मांडेकर महिला आघाडी जिल्हा संघटक संगिता पवळे, उपजिल्हा पमुखसंतोष दादा मोहोळ तालुका प्रमुख सचिन खरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन घेण्यात आले.

या वेळी महायुती सरकार चा धिक्कार करुन नराधमाला फाशी ची शिक्षा व्हावी अशी मागणी मुळशी तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.या वेळी भारतीय विद्यार्थी सेना पुणे जिल्हा संघटक राम गायकवाड,भोर विधानसभा समन्वयक कैलास मारणे, महिला आघाडी प्रमुख सुप्रियाताई सरुसे, वृंदा ताई येणपुरे , युवासेना तालुका अधिकारी राम गवारे , दत्ता झोरे, नामदेव टेमघरे, हनुमंत सुर्वे, अनिल आधवडे,शिवाजी भिलारे, ज्ञानेश्वर सावंत , पोपट ववले,शंकर शेलार , योगेश काशीलकर, लिलाबाई मरगळे, नितीन साठे, सचिन सावंत, मुकेश लोयरे, नितीन लोयरे, पंकज धिडे, सुरेखा पवळे, सागर गुजर, शांताराम साळुंके, दिपक मारणे, मंगेश साठे, सागर फाले,राजेश मारणे, पांडुरंग पाडाळे, द्वारका माझीरे,आशा पवळे, सोनाली गोळे, रामभाऊ केमसे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

See also  क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत ऑलिम्पिक दिन साजरा