बार्टी व सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्यावतीने अट्रॉसिटी कायदा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कर्मचारी कायदा, ज्येष्ठ नागरिक कायदा तसेच अनु. जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सामाजिक न्याय भवन विश्रांतवाडी येथे झालेल्या या कार्यशाळेस पोलीस उपायुक्त गजानन टोणपे, समाजकल्याण च्या सहायक आयुक्त श्रीमती संगीता डावखर, नागरी हक्क सरंक्षणच्या उप विभागीय पोलिस अधिकारी श्रीमती. तावरे, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, राष्ट्रीय हेल्पलाईनच्या श्रीमती रेखा आनंद आदी उपस्थित होते.

यावेळी सरकारी अभियोक्ता श्री. पाटील यांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा यातील तरतुदींवर सविस्तर मार्गदर्शन केले. सुनील कांबळे यांनी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असणारे कायदे व तरतुदी याबाबत मार्गदर्शन केले. बार्टीच्या प्रकल्प अधिकारी शीतल बंडगर यांनी ‘प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲज मॅन्युअल स्कॅव्हेंजन ॲण्ड रिहॅबिलिटेशन ॲक्ट- २०१३’ याविषयी मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय हेल्पलाईनच्या श्रीमती रेखा आनंद यांनी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असणाऱ्या हेल्पलाईन बद्दल मार्गदर्शन केले. नागरी हक्क संरक्षणच्या पोलीस निरीक्षक श्रीमती सुरभी पवार यांनी कायदा व सामान्य नागरिक म्हणून आपली समाजाप्रती जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.

सामाजिक न्याय पर्व मधील कार्यक्रम सामाजिक न्याय व विशेष सहा.विभागाचे सचिव सुमंत भांगे, बार्टी चे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू आहेत, असे प्रास्ताविकात श्रीमती डावखर यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमास पोलीस कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सफाई कर्मचारी तसेच पुणे जिल्हा समता दूत उपस्थित होते.

See also  वसुंधरा अभियान बाणेरला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्रदान, राज्यस्तरीय तृतीय क्रमांक