बालेवाडी हायस्ट्रीट ग्राऊंड येथे अमोल बालवडकर फाऊंडेशन आयोजित भव्य दहीहंडी उत्सवात ऑलिंपिक विजेता खेळाडू स्वप्नील कुसळे व प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी यांची उपस्थिती

बालेवाडी : बालेवाडी हायस्ट्रीट ग्राऊंड येथे अमोल बालवडकर फाऊंडेशन आयोजित भव्य दहीहंडी उत्सवात ऑलिंपिक विजेता खेळाडू स्वप्नील कुसळे व प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी यांची उपस्थिती राहणार आहे.

मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी सायं. ०५ वाजता बालेवाडी हायस्ट्रीट ग्राऊंड येथे अमोल बालवडकर फाऊंडेशन आयोजित भव्य दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न होणार आहे.

यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाची मान उंचावणारा सुस- म्हाळुंगे परिसरातील खेळाडू स्वप्नील कुसळे याने ५० मी. रायफल शूटिंग स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिल्याबद्दल त्याचा समस्त पुणेकर आणि कोथरूडकरांच्या वतीने जाहीर सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे.

तसेच या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे यावेळी सुप्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी देखील उपस्थित राहणार आहे. तरी या दहीहंडी उत्सवाला सर्व बालगोपाळांनी आणि विविध मंडळांनी उपस्थित राहून थरावर थर रचत सोहळ्याची रंगत वाढवावी असे आवाहन माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केले आहे.

See also  स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला