कोथरूड : कोथरूड मधील महाराष्ट्र व निर्माण सेना व ओम चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम महिला भगिनींसाठी सुरू झालेला महिला दहीहंडी महोत्सव यंदाच्या वर्षी आपले “तपपुर्ती” साजरी करत आहे.
कोथरूड येथे जीत मैदान वनाज कोथरूड येथे मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता भव्य महिला दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
एखाद्या कुटुंबातील महिला आनंदी असेल तर तिचे संपूर्ण कुटुंब आनंदी असते या उक्तीनुसार कोथरूडमध्ये महिला भगिनींना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळामुळे मिळावा त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण यावेत या हेतूने गेल्या बारा वर्षांपासून महाराष्ट्रात सर्वात प्रथम महिला दहीहंडी महोत्सव असं आयोजन करण्यास मनसे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य तथा माजी नगरसेवक किशोर शिंदे यांनी सुरुवात केली.
दहीहंडी उत्सव हा केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेला उत्सव असं मानलं जातं होतं. परंतु दहीहंडी महोत्सव ही केवळ पुरुषांची मक्तेदारी नसून महिलांना देखील त्यामध्ये सहभागी होता आलं पाहिजे या महोत्सवाचा आनंद लुटता आला पाहिजे या हेतूने १२ वर्षापूर्वी हा महोत्सवास सुरुवात करण्यात आला.
या महिला दहीहंडी महोत्सवामध्ये कोथरूड मधील जीत मैदानावर सुमारे २५ ते ३० हजार महिला भगिनी सहभागी होऊन दहीहंडी महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटतात. या दहीहंडी महोत्सवामध्ये केवळ आणि केवळ महिला भगिनीच उपस्थित असतात आणि दहीहंडी फोडण्याचा मान देखील महिलांनाच दिला जातो. अतिशय शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे.
दरवर्षी प्रमाणे राज्यातील सर्वात मोठ्या महिला दहीहंडीच्या उत्सवात तपपुर्ती निमित्ताने सर्व पुणे शहरातील व कोथरूड मतदार संघातील महिला भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी नगरसेवक किशोर शिंदे यांनी केले आहे.