उंड्रीमध्ये अनधिकृत फ्रंट मार्जिन पत्रा शेड व रोड एनक्रोचंमेंटवर पालिकेचा हातोडा

पुणे : उंड्री (ता. हवेली) मधील अनधिकृत फ्रंट मार्जिन पत्रा शेड व रोड एनक्रोचंमेंटवर कारवाई केली. बांधकाम विकास विभाग झोन-१च्या वतीने सुमारे ९७०० चौरस फूट अनधिकृत बांधकामावर
कारवाई करण्यात आले.

यावेळी अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे , कार्यकारी अभियंता सुरेश साखळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता संदीप शिंदे कनिष्ठ अभियंता ऋतुजा चिलकेवार, सागर शिंदे व किरण आहिरराव यांच्या पथकाने दहा बिगारी, एक जेसीबीच्या साहाय्याने कारवाई केली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.नियमबाह्य बांधकामे तात्काळ पाडण्यात येतील आणि संबंधितांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी बांधकामा संदर्भातील सर्व परवानग्या घेऊनच कामे करावीत, कोणीही बेकायदेशीर बांधकाम करण्याचा प्रयत्न करू नये असे उप अभियंता बांधकाम विभाग संदीप शिंदे सांगितले.

See also  प्रदेश प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ॲड डॉक्टर मधुकर मुसळे यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघामध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल