हिंजवडीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पीएमआरडीएकडून सहा रस्त्यांची आखणी

हिंजवडी : हिंजवडी भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी ६ रस्त्यांची आखणी केली आहे. या संदर्भातील मर्सिडीज शोरूम ते म्हाळुंगे (MIDC Circle) या रस्त्यावरील जमीन अधिग्रहणासंदर्भात थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत गुरुवारी औंध कार्यालयात त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

या बैठकीत महानगर आयुक्तांनी शेतकऱ्यांचे हक्क आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे स्पष्ट केले. रस्ते रुंदीकरण प्रकल्पाच्या प्रक्रियेमुळे कोणत्याही शेतकऱ्याला आर्थिक आणि इतर नुकसान होणार नाही, याची प्रशासनाने खात्री दिली.

हिंजवडी-माण, मारुंजी परिसरातील प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी हा संवाद महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. PMRDA नेहमीच नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक आणि ठोस निर्णय घेण्यास कटिबद्ध आहे. 

यावेळी आमदार शंकर मांडेकर, मुख्य अभियंता रिनाज पठाण,  नियोजन विभागाच्या विभागप्रमुख श्वेता पाटील, जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे, अधीक्षक अभियंता शिवप्रसाद बागडी, यांच्यासह इतर अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

See also  सरकाराने वारकरी बांधवांची माफी मागावी-( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शिवसेना मुळशी तालुक्याची मागणी