माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या हस्ते कोथरूड मधील विविध मंडळांची गणेश आरती

कोथरूड : पुणे शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कोथरूड परिसरातील विविध मंडळांच्या आरत्यांना उपस्थिती लावत तसेच गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त करत सहभाग घेतला.

यावेळी कोथरूड परिसरातील नवभुमी मित्र मंडळ , मुठेश्वर मित्र मंडळ, हमराज मित्र मंडळ, नवयुग मित्र मंडळ आदी विविध मंडळांच्या गणरायाची आरती केली.

गणेशोत्सवा गणरायाच्या आगमनाचे जोरदार स्वागत मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी विविध पक्षांचे कार्यकर्ते, गणेश मंडळांचे कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

See also  प्रत्येक जिल्ह्यात'नमो ११ कलमी कार्यक्रम' प्राधान्याने राबवावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे